Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रmaratha reservation मराठा समाज पुन्हा मोर्चे काढणार : पहिला मोर्चा या शहरात

maratha reservation मराठा समाज पुन्हा मोर्चे काढणार : पहिला मोर्चा या शहरात

बीड :

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण बुधवारी रद्द केले. त्यानंतर आता मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. लॉकडाऊन संपल्यावर १६ मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झाले आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिली.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने म्हटले, ५० टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी वैध आधार नव्हता

आज बीडमध्ये मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालनाने दिलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. हे मोर्चे लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून काढण्यात येणार आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली. मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. “मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील.” असा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या