
जालना | Jalana
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चाचली आहे. अखेर गावकऱ्यांनी त्यांना सालाईन घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सलाईन घेतले आहे.
मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. त्यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. यावेळी संभांजी भिडे यांनी जरांगे यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाही, मुख्यमंत्री लबाड नाही. अजित पवार काळजी असलेला माणूस आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही तुमची मागणी १०० टक्के योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.