मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
मुख्य बातम्या

EBC लाभ मराठा समाजास नाही

राज्य सरकारचा निर्णय

jitendra zavar

jitendra zavar

मुंबई। Mumbai

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांचे (Economically Backward Class (EBC)) १० टक्के आरक्षण मराठा समाजाला घेता येणार नाही. राज्य शासनाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. परंतु केंद्र शासनाच्या सेवांमधील प्रवेशासाठी मराठा समाजाला ईबीसीचा लाभ घेता येईल.

केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणा देण्याचा कायदा केला आहे. ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा फायदा नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत घटकांचा त्यात समावेश केला आहे. परंतु महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१९ पासून मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातून राज्य शासकीय सेवा आणि शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी आरक्षण आहे. यामुळे मराठा समाजातील उमेदवार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत अशा तक्रारी शासनाला मिळाल्या होत्या. त्यामुळे हा लाभ मराठा समाजास घेता येणार नाही, असे परिपत्रक शासनाने काढले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com