सकल मराठा समाजाचा भुजबळ फार्मवर ठिय्या

सकल मराठा समाजाचा भुजबळ फार्मवर ठिय्या

नाशिक | प्रतिनिधी

अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठा आरक्षणाला पाठींबा देत वजनदार नेते म्हणवले जाणारे छगन भुजबळ यांनी भूमिका घेतली पाहिजे या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने आज भुजबळ फार्म येथे ठिय्या आंदोलन केले.

यावेळी जिल्ह्यातील मराठा समाजबांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर नुकतीच राज्यात घोषणा करण्यात आलेली पोलीस भरती काही दिवस रद्द करावी किंवा मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com