Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये मराठा आंदोलनास सुरुवात, पालकमंत्री भुजबळ म्हणाले...

नाशिकमध्ये मराठा आंदोलनास सुरुवात, पालकमंत्री भुजबळ म्हणाले…

नाशिक

नाशिकमध्ये छत्रपती खा. संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यांसह सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणावर भुमिका मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये मराठा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. यामुळे नाशिककडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरु झालेल मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन 36 जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते.

‘समाज बोलला,आम्ही बोललो,आता तुम्ही बोला’ असं म्हणत मराठा समाजाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे. या मूक आंदोलनात, सर्वपक्षीय नेते भूमिका मांडणार आहे. या आंदोलनात विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ,मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे यासह खासदार डॉ भारती पवार,हेमंत गोडसे भूमिका मांडणार आहे. आपल्या भाषणात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेस आपला पाठिंबा असल्याचे सांगून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली.

मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत नाही. सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मिळायला हवं ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे. ओबीसी आक्रोश मोर्चा मराठा आरक्षण विरोधात नाही. दोघांचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं नाकारलं, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या