Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण : उदयनराजे, चंद्रकांत पाटील सरकारवर संतापले

मराठा आरक्षण : उदयनराजे, चंद्रकांत पाटील सरकारवर संतापले

मुंबई

मराठा आरक्षणावर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारचा वकील अनुपस्थित राहिले. यामुळे सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली. यावरुन राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे.

- Advertisement -

भाजपचे राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हे महाविकास आघाडी सरकारवर संतापले आहे. बुधवारी उदयनराजे भोसले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाद्वारे मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदा सुनावणी होणार होती. मात्र सरकारचे वकील उपस्थित नव्हते. यावरुन सरकार आणि वकिलांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे यावरुन सिद्ध होते. मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन चार आठवडे झाले आहे, तरीही सरकार सुस्त आहे. आरक्षणावरील निकाल आला नसल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनची समस्या आहे. शेकडो तरुणांतच्या नोकरीचा मुद्दा पेंडिंगमध्ये आहे. तरीही सरकारला जाग आलेली नाही.’

दिड महिन्यापासून सरकार झोपले होते का

उदयनराजे पुढे म्हणाले की, ‘सरकारला वाटते की, मराठा आरक्षणावरील सुनावणी संविधान पीठाने करावी तर दिड महिन्यापूर्वीच मागणी का करण्यात आली नाही? दिड महिन्याचा वेळ वाया का घातला?’

चंद्रकांत पाटील यांनी चव्हाणांना केल लक्ष

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. “मराठा समाजाला आरक्षण देऊन‌ आपल्या युवकांचे भविष्य सुरक्षित करणे हे आपल्या राज्यासमोरील मोठे आव्हान आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एमपीएससी परीक्षा होत नाही आहे आणि हे सर्व केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे होत आहे. राज्य सरकार बोलत एक आहे आणि करत एक आहे. आपल्या भवितव्यावर टांगती तलवार आहे, हे पाहून काही तरुण टोकाचा निर्णय घेत आहेत. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही घटना घडली. त्यावरून एकच विचार डोक्यात येतो… इतका संवेदनशील विषय असून, देखील राज्य सरकार इतके बेजबाबदारपणे कसे काय वागू शकते?, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या