Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटातील काही आमदारांची गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ; नाराजीची चर्चा

शिंदे गटातील काही आमदारांची गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ; नाराजीची चर्चा

मुंबई | Mumbai

राज्यातील राजकीय भूकंपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह आज गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यासाठी शिंदे गटातील दिग्गज नेते गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

- Advertisement -

मात्र, शिंदे गटाच्या या गुवाहाटी दौऱ्याला काही आमदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री शंभुराज देसाई, आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज गुवाहाटी दौऱ्यावर गेले नाहीत.

तसेच, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणेदेखील गुवाहाटीला गेले नाहीत. शिंदे गटातील काही आमदार मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने नाराज आहेत. त्यामुळे ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले नसल्याचे समजते. वैयक्तिक कारणांमुळे हे आमदार येत नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट असे दोन मुख्य कार्यक्रम असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गुवाहाटी विमानतळावर स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. त्याचसोबत काही महिन्यांपूर्वीच या दौऱ्याची तयार करण्यात आली होती.

ज्योतिषाला हात दाखविल्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंवर टीका होत होती. अशातच आता पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाण्यावरून त्यांचा हा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या