Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यासीईटी नोंदणीत अनेक अडथळे

सीईटी नोंदणीत अनेक अडथळे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अकरावी प्रवेशासाठी ( Eleventh Std Admission ) राज्य मंडळामार्फत घेतल्या जाणार्‍या सीईटी( CET ) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालीआहे . मात्र पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास अनेक समस्या उद्भवल्याचे दिसून आले. राज्य माध्यमिक मंडळाकडून देण्यात आलेल्या लिंक ओपन होत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या.

- Advertisement -

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एकीकडे अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेची तयारीही सुरू झाली आहे. दुसरीकडे प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासोबतच सीबीएसई, आयसीएसई यासह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही अकरावीसाठी ही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.

दरम्यान, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नसून इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना 178 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 21 ऑगस्टला ऑफलाईन पद्धतीने ही सीईटी होणार असल्याचे राज्य मंडळामार्फत जाहीर करण्यात आले आहे.

ही परीक्षा ऐच्छिक असून राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. मंडळाने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजांच्या परीक्षा केंद्रांवर 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत अकरावी सीईटीचे आयोजन केले जाणार आहे.

अशी होणार परीक्षा

इंग्रजी, गणित (भाग 1 आणि 2), विज्ञान व तंत्रज्ञान (भाग 1 आणि भाग 2) सामाजिक शास्त्रे या चार विषयांवर शंभर गुणांची ही ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या (एमसीक्यू) प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. परीक्षेसाठी नोंदणी करण्यास विद्यार्थ्यांना 26 जुलैपर्यंत मुदत आहे. परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज, अभ्यासक्रम यासह अधिक माहिती मंडळामार्फत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या