Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभुजबळांंकडून एका दगडात अनेक शिकार

भुजबळांंकडून एका दगडात अनेक शिकार

नाशिक । फारूक पठाण | Nashik

महापालिकेच्या (Municipal Corporation) 2017 सालच्या निवडणुकीमध्ये (election) तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी एका सभेत

- Advertisement -

नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) दत्तक (Adopted) घेण्याची घोषणा केली होती. यानंतर नाशिककरांनी (nashikkar) भारतीय जनता पक्षाच्या हाती महापालिकेचा कारभार दिला.

गत पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) वतीने महापालिकेत विविध कामे करण्यात आली, यातील काही कामे अत्यंत वादग्रस्त देखील ठरली. मात्र करोना (corona) तसेच त्यानंतर आलेल्या ओबीसी आरक्षणाचा वाद (OBC reservation dispute) यामुळे वेळेत निवडणूक (election) न झाल्यामुळे नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकराज सुरू झाले.

यामुळे गत पाच वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या काळातील कामांचा पंचनामा (panchanama) करण्याची पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांना आयती संधी मिळाली.आज महापालिकेत येऊन सुमारे चार तास महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेत विविध वादग्रस्त विषयांवर हात घालून त्यांनी चौकशीचे आदेश दिल्यामुळे एका दगडात भुजबळांनी अनेक शिकार केल्याचे दिसून आले.

2017 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. तर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly elections) राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) व काँग्रेस (Congress) यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राज्याची सत्ता काबीज केली. नाशिक जिल्ह्याचे (nashik district) पालकमंत्री म्हणून पुन्हा छगन भुजबळ यांनी कमान सांभाळली. दरम्यान, नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने भुजबळांची तशी करडी नजर होती, मात्र सध्या प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर महापालिकेचा कारभार एक प्रकारे राज्य शासनाच्या हातात गेल्यानंतर त्यांनी आज जवळपास अर्धा दिवस नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) देऊन सर्व विभागाचा आढावा घेतला.

यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मागील पाच वर्षात झालेल्या कामांचा पंचनामा सादर केला. त्यांनी अनेक गंभीर विषय तसेच आर्थिक विषयांना हात घालून प्रशासकांना याबाबत चौकशी करण्याचे निर्देश देत आदेशित केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच ना. भुजबळांनी स्पष्ट करताना महापालिकेत कधी आलो नाही, असे सांगितले.

मात्र मुंबईचा महापौर होतो त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाचा संपूर्ण अभ्यास माझ्याकडे आहे, असे म्हणत आता महापालिकेत प्रशासक राज आहे. महापालिकेच्या कामाची जबाबदारी प्रशासक म्हणून आयुक्तांवर देण्यात आली आहे. यामुळे महापालिकेत सुमारे चार तास आढावा घेतला. यामध्ये आर्थिक, इंजीनियरिंग, पाणी, पर्यटन, आरोग्य, बांधकाम, नगर रचना आदी विभागांचा आढावा घेत अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सुमारे आठशे कोटींच्या भूसंपादनाचा विषय असो की नवीन नाशिक भागात होणारा नवीन उड्डाणपूल यांचा विषय तसेच फाळके स्मारक खाजगीकरणाचा विषय असो की भूखंडांचा बीओटी तत्त्वावर विकास अशा सर्व विषयांवर भुजबळांनी विशेष लक्ष दिले. तसेच विविध प्रकारच्या सूचना देखील केल्या. पालकमंत्री भुजबळ हे जुने राजकारणी असून त्यांना जिल्ह्यातील खडान्खडा माहित आहे. यामुळे प्रत्यक्ष महापालिकेत ते जरी आले नव्हते तरी त्यांच्यापर्यंत बारीक-सारीक माहिती पोहोचत होती. यामुळेच त्यांनी आजचा टाइमिंग साधत आढावा घेत सर्व विषयांना हात घातला.

स्थायीच्या सभागृहात आढावा

महापालिकेत आढावा घेण्यासाठी ना. भुजबळ यांचे आगमन झाल्यानंतर प्रवेशद्वारावर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, प्रशासन उपायुक्त मनोज गोडे -पाटील, नगरसचिव राजू कुटे आदी वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर भुजबळ थेट स्थायी समितीच्या सभागृहात गेले. अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतात तेव्हा महापालिका आयुक्तांच्या दालनाच्या शेजारी असलेल्या सभागृहात अशा प्रकारचा आढावा घेण्याची परंपरा दिसून आली आहे, मात्र भुजबळ यांनी स्थायी समितीचे सभागृह का निवडले अशी चर्चा सुरू होती.

आयुक्त-भुजबळ कानगोष्टी

पालकमंत्री आढावा घेतात त्यावेळेला प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत पत्रकार देखील उपस्थित असतात. मात्र आजच्या बैठकीत पत्रकारांना आम्ही पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्यामुळे आपण कृपया बाहेर जावे अशी विनंती करण्यात आली. तसेच सभागृहाचे दार बंद करून आत सुमारे चार तास आढावा घेण्यात आला. दरम्यान, आढावा बैठकीत महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार तसेच पालकमंत्री भुजबळ यांच्यात अनेक वेळा कानगोष्टी झाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या