Corona
Corona
मुख्य बातम्या

देशात गेल्या 24 तासात तब्बल "इतके" करोना बाधित

दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारला

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

गेल्या आठवड्यापासून देशातील करोनाबाधितांचि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 38 हजार 902 बाधित आढळले असून गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 543 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारतातली करोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 10 लाख 77 हजार 618 इतकी झाली आहे. देशात सध्या 3 लाख 73 हजार 379 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 6 लाख 77 हजार 423 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63.03 टक्के एवढा झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com