लष्कराची कमान मराठी सुपुत्राच्या हाती

मनोज पांडे यांनी स्वीकारला पदभार
लष्कराची कमान मराठी सुपुत्राच्या हाती

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

जनरल मनोज पांडे यांनी लष्करप्रमुख ( Army chief- Manoj Pande ) म्हणून पदभार स्वीकारला आहे. मनोज मुकुंद नरवणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर लष्करप्रमुखपदाची जबाबदारी जनरल पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

मनोज पांडे हे मूळ नागपूरचे असून चौथे मराठी अधिकारी लष्कराच्या प्रमुखपदी विराजमान झाले आहेत. नरवणे हेदेखील मराठीच असल्याने सलग दुसर्‍यांदा मराठी अधिकार्‍याला लष्करी दलाचे प्रमुख होण्याचा मान मिळाला.

लष्करात लढाऊ आर्म व सेवा आर्म असे दोन भाग असतात. पायदळ, रणगाडा व तोफखाना हे तीन प्रमुख लढाऊ आर्म असतात. या जोडीलाच इंजिनीअर्सदेखील युद्धस्थितीत किंवा संकटसमयी सीमेवर उभे राहून शत्रूचा सामना करतात. त्यामुळेच इंजिनीअर्स हेदेखील लढाऊ आर्म म्हणून गणले जाते.

लष्करात आजवर 27 पैकी 22 प्रमुख हे पायदळातील होते. या स्थितीत इंजिनीअर्सना मनोज पांडे यांच्या रुपाने पहिल्यांदाच लष्करप्रमुखपदाची संधी मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com