Maratha Andolan : "सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण..."; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

Maratha Andolan : "सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण..."; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

जालना | Jalna

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना (Jalana News) येथील अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषण (Hunger Strike) करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १० वा दिवस आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाची गंभीर दखल घेत त्यांच्या मनधरणीसाठी दोन वेळा शिष्टमंडळ पाठविले होते. परंतु, दोन्हीही वेळेस शिष्टमंडळाला यावर तोडगा काढण्यास अपयश आले.

यानंतर काल राज्य सरकारने (State Government) मंत्रिमंडळाच्या बैठकीत निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील (Maratha Community) नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेत मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. राज्य सरकारच्या या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यानंतर आज सकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आपल्याला काडीचाही उपयोग नसल्याचे म्हणत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

Maratha Andolan : "सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण..."; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका
Dahihandi 2023 : राज्यभरात दहीहंडीचा उत्साह; मुंबई, ठाण्यात रंगणार थरांचा थरार

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात (Reservation) आदेश काढले. पण या आदेशाची प्रत आमच्यापर्यंत आली नाही. माध्यमांकडून काही महत्वाचे मुद्दे कळाले आहे. मराठा समाजातील ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहे, त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण सर्व सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. तर सरसगट प्रमाणपत्र देण्यासाठी एक महिन्याची वेळ सरकारने मागितली आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण त्यामध्ये थोडा बदल करण्यात यावा, सरकारने तो बदल करून घ्यावा त्यानंतर आम्ही निर्णय घेतो. आम्ही शांतपणे आंदोलन करत आहोत. आमचे सहकारी आजही रुग्णालयात उपचार घेत आहे. तरीही आम्ही शांतपणे उपोषण करत आहे. त्यामुळे वंशवंळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच, आमच्याकडे पुरावे असल्याचे आम्ही आधीच सांगितले आहेत. त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत, घेऊन जावेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Maratha Andolan : "सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण..."; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका
राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक; नाशकातही हजेरी, आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

ते पुढे म्हणाले की, आम्ही सरकारच्या निर्णयावर दहा पावले मागे यायला तयार आहोत. पण सरकारने वंशावळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. जर मराठा समाजाकडे वंशावळीचे (Genealogy) पुरावे असते तर तहसील किंवा उपविभागीय कार्यालयातून कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळाले असते. त्यासाठी राज्य शासनाला अध्यादेश काढण्याची गरज पडली नसते. मात्र, अधिकारी शब्दांचा खेळ करत समितीला एक महिन्याचा वेळ वाढविण्यासाठी आणि आंदोलकांना खुश करण्यासाठी हा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Maratha Andolan : "सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण..."; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका
मानव केंद्रित जागतिकीकरण : शेवटच्या घटकापर्यंत जी 20 नेताना कोणालाही मागे राहू देणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com