Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Andolan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात; घेतला 'हा'...

Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यामधील (Ambad Taluka) अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तब्बल १७ दिवस उपोषण केले होते. तसेच मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी सातत्याने राज्य सरकारचे शिष्टमंडळ पाठविले जात होते. पंरतु, या शिष्टमंडळाला त्यांची मनधरणी करतांना अपयश येत होते.

- Advertisement -

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसेच उपोषण सोडले असले तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते. यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मैदानात उतरणार आहेत…

Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या अल्टीमेटमला येत्या १४ ऑक्टोबर रोजी ३० दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारला जागे करण्यासाठी हा कार्यक्रम असणार असून यामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला (Maratha Community) संबोधित करतील. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी जरांगे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने वेळ मागितला आहे आणि आरक्षण देणार देखील तेच आहेत. वेळ देणे अपेक्षित होते म्हणून वेळ दिला आहे. आम्ही जास्तीचे दहा दिवस दिलेत. त्यांनी एक महिना वेळ मागितला होता आम्ही ४० दिवस वेळ दिला आहे. १४ तारखेला त्यांचे बरोबर ३० दिवस पूर्ण होत आहेत, त्यापुढे १० जास्तीचे दिले आहेत. त्या काळात त्यांनी आरक्षण द्यावे यासाठी १४ तारखेला अंतरवाली सराटीत मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar : “माझं ते काम…”; शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, आमचे सर्व कार्यक्रम शांततेत होणार आहेत, राज्यात देखील शांततेत साखळी उपोषण सुरू आहे. काल मराठा समाजाची मोठी बैठक पार पडली. ज्यामध्ये सर्वांनी कार्यक्रम, महाराष्ट्र दौऱ्याविषयी निर्णय घेण्यात आला असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra) सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, या मागणीवर जरांगे ठाम असून त्यांच्याकडून राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती. यानंतर आता सरकारला दिलेल्या मुदतीत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर जरांगे पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना; भारताला मालिका विजयाची संधी

- Advertisment -

ताज्या बातम्या