Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशमन की बात : शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार

मन की बात : शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार

नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी ६९ वेळा ‘मन की बात’ (Mann Ki Baat)कार्यक्रमातून संवाद साधला. देशातील शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधतांनी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्याचे नाते जमिनीशी जोडले असते तो कोणतेही मोठे संकट झेलण्यास समर्थ असतो. आमचे शेतकरी त्याचे उत्तम उदाहरण आहे. करोनाच्या या कठीन काळात आमचे कृषी क्षेत्र व आमचे शेतकरी यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. संकट काळात आमच्या शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर भारताचा आधार असल्याचे दाखवून दिले आहे. यामुळे शेतकरी मजबूत झाला तर देश समर्थ होईल.

कथेचे परंपरा कायम ठेवा

आपण सर्व लोक, नव्या पिढीला आपल्या महापुरुषांबद्दल, महान माता आणि भगिनींबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो. भारतात आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होता, त्या किती महत्त्वाच्या होत्या ते लक्षात घ्या. आपण ही परंपरा कायम ठेवा. जेव्हा आपण त्यांचे पालन करत नाही तेव्हा आपल्याला त्यांचा किती अभाव जाणवतो, याची जाणीव आपल्याला या काळात निश्चितच झाली असेल. अशीच एक प्रथा म्हणजे गोष्टी सांगण्याची कला आहे, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या