मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर, एम्समधील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली

मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर, एम्समधील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे. डाॅ. नितीश नायक यांच्या देखरेखाली उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे AIIMS च्या सूत्रांनी सांगितले.

मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर, एम्समधील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली
डिझेलवर धावणाऱ्या १ हजार एसटींचे सीएनजीमध्ये रुपांतर

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आला, त्यानंतर त्यांना एम्स रुग्मालयामध्ये दाखल करण्यात आले आगेय दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता. आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी एम्समध्ये जाऊन मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि त्यांची प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनीही ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, 'मी डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.'

Related Stories

No stories found.