Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला उजाडणार 2026 

मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला उजाडणार 2026 

औरंगाबाद – Aurangabad

मराठवाड्याच्या (Marathwada) प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड ते परभणी रेल्वेमार्ग (Manmad to Parbhani railway line) करण्याची मागणी आहे. रेल्वेने हा प्रकल्प रद्द केला होता. मात्र राष्ट्रीय आराखडा तयार करण्यात आला असून त्यात 2026 मध्ये रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विशेष दिल्ली मुंबई फ्राइट कॉरिडॉर (Delhi Mumbai Freight Corridor) अंतर्गत विशेष मालवाहतुकीसाठी मार्ग तयार करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

- Advertisement -

देशभरातील रेल्वेच्या विकासाचा विशेष आराखडा वर्ष 2020 मध्ये तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात देशभरातील प्रवासी वाहतुकीत होणारी वाढ, तसेच माल वाहतुकीत भविष्यातील उलाढालीबाबत विचार करण्यात आला आहे. या आराखड्यात आगामी काही काळात महत्त्वाची शहरे आणि इतर महत्त्वाची मालवाहतूक क्षेत्राचा विकास होत आहे. याची सर्व प्रकारची मांडणी करण्यात आली आहे.

भविष्याच्या दृष्टीने दिल्ली मुंबई कॉरीडॉर महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे मालाची वाहतूक रेल्वेतूनच केली जाणार आहे. मराठवाड्यातील पर्यटन, औद्योगिक विकास, विस्तारही करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. मनमाड- परभणी दुहेरीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनमाड-मुदखेड रेल्वेचे दुहेरीकरण आराखड्याच्या अंतिम मसुद्यात समाविष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मनमाड-औरंगाबाद-परभणी मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव त्यामुळे मार्गी लागू शकतो. हा प्रकल्प 2026 मध्ये दुहेरीकरण होईल, असा अंदाज आहे.

नवीन प्रस्तावात डीएमआयसीसाठी रेल्वेच्या पायाभूत विकासासाठी विविध टप्पे करण्यात आलेले आहेत. या टप्प्यात शेंद्रा-बिडकीन, औरंगाबादसह जालना ड्रायपोर्ट, जालन्यासाठी 2026 मध्ये पहिला टप्पा आणि 2031पर्यंत दुसऱ्या टप्प्यात डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या