APMC Election Result : मनमाड बाजार समितीत मविआची सरशी; आमदार कांदेंना धक्का

APMC Election Result : मनमाड बाजार समितीत मविआची सरशी; आमदार कांदेंना धक्का

नाशिक | Nashik

नुकत्याच जिल्ह्यातील काही बाजार समित्यांच्या निवडणुका (Elections to Market Committees) पार पडल्या. या निवडणुकांत दिग्गजांना धक्का बसला असून काहींनी आपली सत्ता कायम राखली. त्यातच आता मनमाड बाजार समितीचा देखील निकाल जाहीर झाला असून अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे...

APMC Election Result : मनमाड बाजार समितीत मविआची सरशी; आमदार कांदेंना धक्का
Video : दिंडोरीच्या पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Manmad Agricultural Produce Market Committee) एकूण १८ जागांपैकी १२ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. याठिकाणी भाजप शिंदे गटाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल व महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली.

APMC Election Result : मनमाड बाजार समितीत मविआची सरशी; आमदार कांदेंना धक्का
नाशिक : धरणात बुडून दोघांचा मृत्यू

दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीला १२, शिवसेना शिंदे गटाला (Shinde Group) ३ तर व्यापारी विकासला २ आणि अपक्ष एका जागेवर विजयी झाला आहे. यावेळी निकालानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com