Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामांजरपाडा परिसर गावे विकासापासून वंचित

मांजरपाडा परिसर गावे विकासापासून वंचित

खोकरविहीर । देवीदास कामडी

सुरगाणा तालुक्यातील ( Surgana Taluka ) केम पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले एक छोटेशे गाव म्हणजे पंगारबारी ( Pangarbari )या गावामध्ये साधारणत: लोकसंख्या 400 ते 450 च्या दरम्यान आहे. परंतु आसपासची गावे आजही विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत. त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

मांजरपाडा प्रकल्पाने( Manjarpada Project ) महाराष्ट्रात नावलौकीक मिळविला. त्या प्रकल्पाने मनमाड, येवला, औरंगाबाद आदी परिसराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने हा प्रकल्प यशस्वी झाला खरा परंतू स्थानिकांना मात्र या प्रकल्पाचा तीळमात्र फायदा झाला नाही. स्थानिक लोक आजही मुलभूत सुविधांपासून वंचितच आहे हे मोठे दुर्भाग्य.

सुरगाणा तालुक्यातील पंगारबारी हे गाव आजपर्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहे. या गावामध्ये दळणवळण करण्यासाठी रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे. एखादी गरोदर स्त्री दवाखान्यात नेण्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात. त्याचप्रमाणे शेजारीच चालू असलेल्या मांजरपाडा प्रकल्प यामुळे अवजड वाहने चालू असल्याने पंगारबारी – गोगुळ – पांढरी (देवसाने) या रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे. रस्त्यामध्ये खड्डे की खड्यामध्ये रस्ते हे ओळखणे अवघड झालेले आहे. परिणामी वणी – दिंडोरी – नाशिक सारख्या शहरात जाण्यास हा रस्ता सोयीस्कर आहे व वेळेची बचत होते. परंतु खराब रस्त्याच्या अभावी खूप वेळ लागतो. त्यामुळे गोगुळ, पांढरी (देवसाने) व इतर गावांचा संपर्क होण्यास अडचणी निर्माण होतात.

पंगारबारी गाव हे ग्रुपग्रामपंचायत – डांगराळे अंतर्गत येते. डांगराळे या ग्रामपंचायतीमध्ये पंगारबारी, मेनमाळ, गोगुळ या गावांचा समावेश होतो. वरील सर्व गावांचा पंचायतच्या कामानिमित्त डांगराळे गावाशी जास्तीत जास्त संपर्क येतो. परंतु ग्रामपंचायतला येण्यासाठी अतिशय झाडी – झुडपांतून वाट काढत जावी लागते. काही वेळेला तर जंगली जनावरांशी, सरपटनार्‍या प्राण्यांशी मृत्यूला कवटाळून जीव मुठीत धरून यावे लागते. त्यामुळे डांगराळे या गावात येण्यासाठी रस्त्याची अत्यंत गरज आहे. या गावात येण्यासाठी ग्रामस्थांना शेवटी नाईलाजाने रात्रीच्या अंदार पडल्यावर लांबच्या अंतराने रोकडपाडा – लाडगाव फाटा – नागझरी फाटा – राहूडे व नंतर डांगराळे असा प्रवास करावा लागतो.

साधारणत: 25 ते 30 कि.मी. अंतर पार करून दुचाकीने किंवा मोठ्या वाहने प्रवास करावा लागतो. परंतु पंगारबारी ते डांगराळे हा रस्ता जर लवकरात लवकर झाला तर अवघ्या 7 ते 8 किमी अंतर हे फक्त 10 ते 15 मिनिटात पार होवू शकते. या रस्त्याचा फायदा पंगारबारी, गोगुळ मेनमाळ, रोकडपाडा, चिकाडी व पंचक्रोशीतील गावातील लोकांना घाटमाथ्यावर जाण्यासाठी जास्तीत जास्त होईल. या रस्त्याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष केंद्रित करून कामास सुरवात करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. डांगराळे या ग्रामपंचायत मधील गोगुळ, मेनमाळ पंगारबारी या गावांमध्ये रस्त्याबरोबरच पाण्याचा , स्मशानभूमी,दशक्रियाविधीसाठी शेड व पाण्याची टाकी, तसेच 1972 सालापासून रखडलेली अर्धवट बंधाराचे कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे वरील सर्व कामे लवकरात लवकर शासनाकडून मजूर होवून भौतिक मुलभूत पूर्ण होतील अशी पंगारबारी, गोगुळ, मेनमाळ ग्रामस्थांना अपेक्षा आहे.

रस्ता डांबरीकरण झाल्यास पंगारबारी, गोगुळ, मेणमाळ, रोकडपाडा, चिकाडी व पंचक्रोशीतील गावातील लोकांना, वाहधारक, भाजीपाला वाहनचालकांना वणी, दिंडोरी, नाशिक जाण्यासाठी जास्तीत जास्त या रस्त्याचा फायदा होईल. अंतर कमी होईल. तरी रोकडपाडा ते पांढरी देवसाने पर्यंत रस्ता लवकरात लवकरच डांबरीकरण होऊन रस्ता सुरळीत करावा.

अरुण मोंढे, सदस्य ग्रामपंचायत डांगराळे

रखडलेली कामे

* पंगारबारी गाव अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे

* रोकडपाडा-पंगारबारी ते पांढरी (देवसाने) रस्ता डांबरीकरण करणे

* रोकडपाडा-मेनमाळ रस्ता डांबरीकरण करणे

* गोगुळ, मेनमाळ व पंगारबारी या तिन्ही गावांना स्वतंत्र स्मशानभूमी

बांधणे.

* गोगुळ, मेनमाळ व पंगारबारी या तिन्ही गावांना स्वतंत्र

दशक्रियाविधी शेड व पाण्याची टाकी बांधणे

* गोगुळ गाव अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे

* 1972 सालापासून अपूर्ण बंधारा (कालवा) चे काम पूर्ण करणे

* पंगारबारी गावाशेजारील नदीवर सिमेंट कॉन्क्रेट बंधारा बांधणे

* केम पर्वताचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणे

- Advertisment -

ताज्या बातम्या