मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार

मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister of Delhi) तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आज दारू धोरणप्रकरणी (Liquor) चौकशीसाठी सीबीआय (CBI) कार्यालयात दाखल होत आहेत.

घराबाहेर पडण्याआधीच सिसोदिया यांचे मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घराबाहेर पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ झेंडे आणि घोषणांनी परिसर गजबजून निघाला होता. दरम्यान सिसोदिया यांच्या घराबाहेर प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तर सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी महात्मा गांधी यांचे स्मारक असलेल्या राजघाटावर (Rajghat) जाऊन अभिवादन केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार
... तर सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं - संजय राऊत

चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट केले की, "आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचं प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग (Bhagat Singh) यांचा अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे."

मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार
द्राक्ष निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकाचा अपघाती मृत्यू

सिसोदिया यांच्या ट्विटनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी रिट्विट करत लिहिले, ''मनीष तुझ्यासोबत देव आहे. लाखो मुलं आणि त्यांच्या पालकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात जाणं हा शाप नसून गौरव आहे. तू लवकरच तुरुंगातून परत येवो, अशी मी परमेश्वराकडं प्रार्थना करतो. मुलं, पालक आणि आम्ही सर्व दिल्लीवासीय तुमची वाट पाहत आहोत.'' दरम्यान, सीबीआय आज मनीष सिसोदिया यांना अटक करू शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे, मात्र चौकशीनंतर चित्र स्पष्ट होईल.

मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार
अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com