Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात 'येथे' मास्क सक्ती; वाढत्या कोरोनाच्या धास्तीने घेतला निर्णय

महाराष्ट्रात ‘येथे’ मास्क सक्ती; वाढत्या कोरोनाच्या धास्तीने घेतला निर्णय

मुंबई | Mumbai

कोरोनाने (Corona) अलीकडे पुन्हा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केल्याने, शासनासोबतच नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने (Mumbai Municipal Corporation) तयारी सुरू केली आहे.

- Advertisement -

आता मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात (Hospital) मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडू लागल्याने, कोरोनाच्या वाढत्या प्रभावानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

येत्या जून पासून लागू होणारनवीन शैक्षणिक धोरण; शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

याचाच भाग म्हणून महापालिकेने मास्क (Mask) सक्ती करण्याच्यादृष्टीने निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने आपल्या सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्यास सक्तीचे केले असतानाच 65 वर्षांवरील वयाच्या व्यक्तींना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कोरोनाने पाय पसरवायला सुरुवात केल्याने वेळीच योग्य ती खबरदारी घ्यायला हवी या हेतूने आता यंत्रणा सतर्क होऊ लागल्या आहेत. मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

‘म्हणून’ मी अयोध्येला गेलो नाही; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

- Advertisment -

ताज्या बातम्या