मन की बात : लाल किल्ल्यावरील घटनेवर मोदी म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्लावर झालेल्या घटनेबाबात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी भाष्य केले. ‘दिल्लीत २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला. असे पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवले.

जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम

आमचा लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे. आज भारत जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. आम्ही सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आमच्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत.

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू करण्याबरोबरच नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव, सेशल्स, मॉरिशस यासह अनेक देशांना भारत लसीचा पुरवठा करत आहे. यामुळे भारताचे जगभरात कौतुक केले जात आहे. अशावेळी पंतप्रधान लसीकरणाच्या पुढील टप्प्याविषयी बोलू शकतात.