Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याMan Ki Baat : पंतप्रधानांनी साधला जनतेशी संवाद, म्हणाले...

Man Ki Baat : पंतप्रधानांनी साधला जनतेशी संवाद, म्हणाले…

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात या कार्यक्रमातून आज देशवासीयांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आज पुन्हा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला.

- Advertisement -

पंतप्रधान बोलतांना म्हणाले, “खेळणी व्यवसाय खूप व्यापक आहे. गृह उद्योग असो, छोटे व लघु उद्योग असोत, MSMEs असोत, यात मोठमोठे उद्योग व खाजगी उद्योजकही त्याच्या अखत्यारीत येतात. या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी देशाला कठोर परिश्रम करावे लागतील. आपल्या देशात स्थानिक खेळण्यांची खूप समृद्ध परंपरा आहे. असे बरेच कुशल आणि कुशल कारागीर आहेत ज्यांना चांगली खेळणी बनविण्यात खास कौशल्य आहे. भारतातील काही क्षेत्रात Toy Clusters विकसित होत आहेत. उदाहरणार्थ, कर्नाटकमधील रामनगरममधील चन्नपटना, आंध्र प्रदेशातील कृष्णामध्ये कोंडापल्ली, तामिळनाडूमधील तंजोर, आसाममधील धुबरी, उत्तर प्रदेशमधील वाराणसी अशा अनेक ठिकाणं आहेत. पण आता विचार करा की, ज्या राष्ट्राकडे एवढी जुनी परंपरा, विविधता आहे. तरूण लोकसंख्या आहे… पण तरीही देशातील बाजारात भारतीय बनावटीची खेळणी कमी असणं किंवा त्यांचं उत्पादन कमी असणं हे आपल्याला योग्य वाटतंय का?’ असं मोदी म्हणाले.

कोरोना संकटाळात सणांचा उत्साह असला तरी निर्बंध देखील त्यांच्यावर कायम आहे. धार्मिक कार्यक्रमात जनतेने संयम दाखवला. तसंच ऑनलाईन, इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. ओनम निमित्त त्यांनी अन्नदाता शेतकऱ्यांना नमन केले. खरीप पिक उत्पादनांत 7% वाढ झाल्याचेही त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले. दरम्यान मन की बात या कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. विशेष करुन आज त्यांनी लहान मुलं, त्यांची खेळणी, खेळ आणि त्यातून त्यांचा होणारा मानसिक-शारीरिक विकास यावर भाष्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या