Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमी शरद पवार बोलतोय...फोनने मंत्रालयात धावपळ

मी शरद पवार बोलतोय…फोनने मंत्रालयात धावपळ

मुंबई :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आवाजाची नक्कल करुन सिल्व्हर ओकमधून बोलतोय, असा थेट फोन मंत्रालयात (Mantralay) करण्यात आला. शरद पवारांचा (Sharad Pawar)फोन आल्याने मंत्रालयात एकाच तारांबळ उडाली. मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात शोध घेत थेट सिल्व्हर ओकपर्यंत (Silver Oak) पडताळणीसाठी कॉल करण्याची वेळ आली. त्यावेळी तो कॉल फेक असल्याचे लक्षात आले.

- Advertisement -

१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा आवाज काढून थेट मुख्यमंत्री कार्यलयात एका पट्ट्याने फोन केला होता. फोन करून अमुक एक व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, असं थेट फर्मानच दिलं होतं. खुद्द शरद पवार (Sharad Pawar) फोन करत आहेत,असा प्रकार कधी होत नाही.याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर खंडणी विरोधी पथकाकडून तपास सुरू झाला आणि एकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या फोनच्या प्रकरणात खंडणीविरोधी पथकाने एकाला पुण्यातील जेऊर येथून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण आहे, त्याने कुणासाठी पवारांच्या आवाज काढत कॉल केला होता, या संदर्भात पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली आहे. तसेच कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत हा फोन करण्यात आला होता, याबाबतची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या