ममतांनी बंगालचा गड जिंकला, पण नंदीग्राममधून पराभूत

ममतांनी बंगालचा गड जिंकला, पण नंदीग्राममधून पराभूत
ममता बॅनर्जी

नवी दिल्ली

पश्चिम बंगालमध्ये परत एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत परतणार असतांना नंदीग्राममधूनही ममता बॅनर्जी पराभूत झाल्या आहेत. १७ व्या फेरीअखेरी भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांचा १९५३ मतांनी पराभव केला. ममता बॅनर्जी यांनी बंगालचा गड जिंकला. पण गड जिंकणाऱ्या ममता स्वत: पराभूत झाल्या.

Title Name
पश्चिम बंगाल निवडणुकीचे हिरो प्रशांत किशोर सल्लागाराचे काम सोडणार
ममता बॅनर्जी

नंदीग्राममध्ये पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी दुपारी दोन नंतर आघाडी घेतली आहे. १७ व्या फेरीअखेरी भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकापरी यांचा ममता यांनी पराभव केला. अशी बातमी आधी आली होती. त्यानंतर मात्र ६.३० वाजता ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचे बातमी आली. १९५३ मतांनी त्या पराभूत झाल्या. नंदीग्राम मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची होती.

पश्चिम बंगालच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेस २१२ च्या पार गेली आहे. भाजप ७८जागांवर पुढे आहे. तर काँग्रेसला १ जागांवर आघाडी मिळाली आहे.

Title Name
West Bengal Election Result : ममतांची डब्बल सेंच्चुरी, भाजप शंभरपासून दूर
ममता बॅनर्जी

राज ठाकरेंकडून अभिनंदन

या निवडणूक निकालाबाबत राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करताना म्हटलं की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्याच्यात खूप समानता आहे असं ते म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com