Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

दिल्ली | Delhi

काँग्रेस पक्षात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षाला २४ वर्षांनंतर बिगर गांधी अध्यक्ष मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली आहेत.

- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पदग्रहणनिमित्त काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात पक्षाच्या दीर्घकाळ अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. भारत जोडो यात्रेच्या तीन दिवसांच्या दिवाळी ब्रेकमध्ये ४८ दिवसांनंतर प्रथमच दिल्लीत आलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

अध्यक्ष झाल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात खर्गेंनी पक्षात 50 टक्के पदे 50 वर्षांखालील व्यक्तींना देण्याची घोषणा केली. खरगे म्हणाले, उदयपूर अधिवेशनात पक्षातील 50 टक्के पदे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना देण्याचा प्रस्ताव लागू केला जाईल.

आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. आज एका सामान्य कार्यकर्त्याची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करून हा सन्मान दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आपण प्रत्येक आव्हानाशी एकत्र लढू आणि प्रत्येक खोटे उघड करू असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या