Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याकांदेंनंतर आता मौलाना मुफ्ती नाराज: म्हणाले, सत्ताधारी पार्टीतील आमदारांनाच...

कांदेंनंतर आता मौलाना मुफ्ती नाराज: म्हणाले, सत्ताधारी पार्टीतील आमदारांनाच…

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (suhas kande)आणि पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांच्यांतील निधी वाटपातील वादामुळे चर्चेत आलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज झाली. पालकमंत्री भुजबळांच्य‍ा (Chhagan Bhujbal)अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सत्ताधारी आमदार कांदे यांच्या नाराजीनंतर विरोधी आमदार एमआयएमचे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईलयांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वर्षांपासून एक रुपया मिळाल नाही. यामुळे विकास कामे घरुन करायची का? आम्हालाही जनतेला उत्तर द्यावे लागणार आहे, असे माध्यमांशी बोलतांना त्यांना सांगितले.

नियोजन समितीत आमदार कांदे यांचे तुर्त समाधान, पण…

- Advertisement -

मालेगावच्या आमदारांची तक्रार

मालेगावमध्यचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासकामांसाठी एक रुपयाही मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. निधी मिळत नसल्याने आपण बैठक सोडून येऊन गेल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांना निधी मिळत नसल्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांची आहे.

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या