मालेगाव बॉम्बस्फोट खटला: साध्वी प्रज्ञा समेत ४ आरोपी गैरहजर

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: साध्वी प्रज्ञा समेत ४ आरोपी गैरहजर

मुंबई:

मालेगावात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याची नियमित सुनावणी गुरूवारपासून सुरु झाली आहे. मात्र आज केवळ तीनच आरोपी कोर्टासमोर हजर झाले. दरम्यान आज १२४ क्रमांकाच्या साक्षीदारापर्यंत जबाब नोंदवले गेले.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात गुरूवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीला आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरेहीत, अजय राहिरकर आणि समीर कुलकर्णी हे तिघे कोर्टासमोर हजर झाले. मात्र, या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ४ आरोपी आले नाही. प्रज्ञासिंह यांच्या वतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या तातडीने हजर होऊ शकणार नाहीत, असे कोर्टाला वकिलांतर्फे कळवले.

प्रज्ञासिंह यांचे वकील प्रशांत मग्गू यांनी न्यायालयात सांगितले की, "कोरोनामुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. सर्व आरोपी न्यायालयात येऊ इच्छिता, परंतु इतक्या कमी कालावधीत त्यांना उपस्थित रहाणे शक्य झाले नाही. त्यांना कमीत कमी आठ दिवसांचा कालावधी हवा आहे.’ न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर सर्व आरोपींना १९ डिसेंबर रोजी हजर होण्याचे आदेश दिले.

लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ १४ जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण ४७५ साक्षीदार आहेत. ज्यातील ३०० हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे.

काय आहे प्रकरण

मालेगावात २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com