तेथे कर आपुले जुळती...

26 /11 ची आठवण करून देतेय हिंगोणा येथील शहीद स्मारक
तेथे कर आपुले जुळती...

हिंगोणा Hingona ता. यावल वार्ताहर

26 नोव्हेंबर 2008 या दिवशी मुंबई (Mumbai) येथे अतिरेकी हल्ला (terrorist attack) झाला होता. त्या हल्ल्यात मूळ हिंगोणा येथील रहीवाशी शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी (Muralidhar Laxman Chaudhary) हे  छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई (Chhatrapati Shivaji Terminus Mumbai) येथे रेल्वे स्थानकावर (railway station) कर्तव्य बजावत(doing duty) असताना शहीद (Martyred) झाले होते. त्यांच्या आठवणी निमित्त हिंगोणा येथे त्यांच्या मूळ गावी ग्रामपंचायत परिसरात (Gram Panchayat area) शहीद स्मारक (Martyr's Memorial) उभारण्यात आले आहे या अतिरेकी हल्ल्यास (terrorist attack) आज  14 वर्षे पूर्ण होत आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण हे स्मारक (Remember the sacrifice) करून देत आहे.

हिंगोणा येथे शहीद स्मारक व्हावे अशी ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती त्यावेळेस तत्कालीन आमदार स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या स्थानिक विकास निधीतून शहीद स्मारक उभारण्यात आले आहे.

हे शहीद स्मारक हिंगोणा येथील तरुण युवक युवतींना प्रेरणा देणारे ठरत आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com