Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशटॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत, कररचना जशीच्या तशी

टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत, कररचना जशीच्या तशी

नवी दिल्ली

कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण कर प्रणालीत कोणताच बदल केला नाही. यामुळे आयकर रचना जशीच्या तशी राहिली. फक्त दिलासा जेष्ठ नागरिकांना मिळाला आहे.

- Advertisement -

1) 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी एक तरतूद सीतारामन यांनी जाहीर केली आहे. यापुढे 75 वर्षांवरील नागरिकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरायची आवश्यकता नाही. या घोषणेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळू शकतो. आयकर परतावा भरावा लागणार नाही.

2) 2021 च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. टॅक्स स्लॅबमध्ये बदल सुचवण्यात आलेला नाही.

3) गंभीर प्रकरणात १० वर्षानंतरचे आयकर केसेस उघडले जाणार आहेत.

4) डिस्प्यूट रिजॉल्यूशन कमेटी तयार करण्यात येणार आहे. यात 50 लाख पर्यंत उत्पन्न आणि 10 लाखपर्यंत वाद असणारी रक्कमसंदर्भातील प्रकरणे या समितीकडे जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या