Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशआजपासून तुमच्याशी संबंधित बदलणार हे नियम

आजपासून तुमच्याशी संबंधित बदलणार हे नियम

नवी दिल्ली

बँकेचे काम, एलपीजी सिलिंडरचे दर, विमान भाडे, बचत योजनांवरील व्याज आणि आयटीआर फायलिंग यासंबंधीचे नियम १ जूनपासून बदलणार आहेत. IRT फायलिंग पोर्टल अद्यावत होत आहे. हे पोर्टल ७ जूनपासून सुरु होणार आहे. यामुळे १ ते ६ जूनदरम्यान जुने पोर्टल पूर्णपणे बंद असेल. जाणून घ्या काय असेल नवीन बदल.

- Advertisement -

नाशिक लॉकडाऊन शिथिल : शैक्षणिक, हार्डवेअर, इलेक्ट्रीकल्स दुकानांसंदर्भात हा निर्णय

ITR साठी नवीन वेब पोर्टल

आयकर विभाग पुढील महिन्यात करदात्यांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार आहे. यामुळे आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होईल. IRT फायलिंग पोर्टल अद्यावत होत अद्यावत होत असल्यामुळे १ ते ६ जूनदरम्यान जुन पोर्टल बंद असेल. यानंतर ७ जून रोजी नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू होईल.

एलपीजी सिलिंडर किंमत

एलपीजी सिलिंडरची किंमत दरमहा बदलते. म्हणूनच १ जूनपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल दिसेल. सिलिंडर गॅस महाग होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत, त्यानुसार एलपीजीची किंमत वाढणार असल्याची शक्यता आहे.

पीएफ नियम

१ जूनपासून PFच्या नियमांमध्ये काही बदल केले जात आहेत. आता कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्याला आधार कार्डशी लिंक करावे लागणार. सोशल सेक्युरिटी कोड २०२० (Social Security Code) च्या कलम १४२ अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेकडून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्पष्टपणे जर एखादं पीएफ खातं आधारसोबत लिंक नसेल तर त्याचा ECR – इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न (Electronic Challan cum Return) भरला जाणार नाही. याचा अर्थ असा की, पीएफ खातेधारकाला कंपनीचा भाग मिळणार नाही. खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना फक्त आपल्याकडून होणारे योगदानच दिसेल. EPFO ची वेबसाईट www.epfindia.gov.in वर लॉग इन करुन पीएफ खात्यास आधार लिंक करता येणार आहे.

व्याजदरात बदल

छोट्या बचत योजनांवर व्याजदर बदलू शकतात. मागील वेळी देखील जोरदार विरोधामुळे ते थांबविण्यात आले. यावेळी नवीन दर लागू होण्याची शक्यता आहे. सरकार या निर्णयाबाबत आदेश जारी करेल.

विमान प्रवास महागणार

सरकारच्या आदेशानुसार १ जूनपासून हवाई प्रवास महागणार आहे. सरकारने कमीत कमी हवाई भाड्याची मर्यादा १६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. ही वाढ १३ ते १६ टक्के असेल.

बँक ऑफ बडोदाची नवी यंत्रणा

बँक ऑफ बडोदा १ जूनपासून चेक पेमेंटचे नियम बदलणार आहे. फसवी चेक रक्कम लक्षात घेता पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन लागू केले जात आहे. ही यंत्रणा केवळ ५० हजार रुपयांच्या धनादेशाच्या वर लागू असेल. याचा फायदा घेण्यासाठी प्रथम बँकेकडून खातरजमा होणे आवश्यक आहे. ग्राहक बँकेला काही महत्त्वाची माहिती देईल, तरच ही सुविधा उपलब्ध होईल

- Advertisment -

ताज्या बातम्या