थार
थार
मुख्य बातम्या

स्वातंत्र्यदिनी महिंद्राची आधुनिक 'थार' बाजारात होणार दाखल

उद्योग क्षेत्रात चैतन्याचे वातावरण

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर | Satpur

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची मुख्य वाहिनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी द्वारे नाशिकच्या प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या 'थार' या एसयूव्ही गाडीचे अनावरण स्वातंत्र्यदिनी (ता. १५) करण्यात येणार असल्याने मंदीच्या सावटात असलेल्या नाशिकच्या उद्योग क्षेत्राला पुन्हा एकदा गती मिळण्यास मदत होणार आहे. कंपनीच्या या धाडसी निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिंद्रा समूहाद्वारे सर्वच दृष्टीने नवीन असलेली 'थार' हे एसयूव्ही वाहन हे प्रगत तंत्रज्ञान, आरामदायी प्रवासासह सुरक्षिततेत स्पर्धेतील इतर वाहनांच्या तुलनेत श्रेष्ठ असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

शहरासह ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यावरून धावण्याची क्षमता या वाहनात आहे. या गाडीची विशिष्ट रचना या मूलभूत वैशिष्ट्यांबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही.

स्वातंत्र्यदिनी भारतीय बनावटीची नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे यापूर्वीच्या क्षमतेपेक्षा जास्त सक्षम करण्यात आले आहे.

या गाडीच्या निमित्ताने नाशिक प्रकल्पातील या नविन उत्पादनाबाबत सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, तसेच कामगारही मोठ्या प्रमाणावर आशावादी आहेत. सध्या नाशिक प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून या गाडीचे उत्पादन युद्धपातळीवर सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

महिंद्राने नुकतेच दुसरी पाळीचेही काम सुरू करत, उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील हजारो कामगारांना यामुळे रोजगार उपलब्ध होत असल्याची भावना कामगार व्यक्त करीत आहेत.

महिंद्राचे सकारात्मक पाऊल करोनाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा थार ही गाडी लाँच करण्याचे धारिष्ट्य दाखवल्यामुळे कामगार वर्गाबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक पाऊल पुढे टाकल्याची भावना महिंद्राचे शेकडो वेडर व लघुउद्योगांनी व्यक्त केली आहे.

ज्या ज्या वेळी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रा विविध संकट अथवा मंदीचे सावट आले, त्या त्या वेळी महिंद्रने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन सेगमेंटमध्ये दमदार पाऊल टाकले.

त्या अनुषंगाने औद्योगिक मंदीच्या चक्रातून बाहेर काढण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. आता करोना संकटकाळात थारचे आनावर हे त्याचेच उदाहरण आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com