जळगाव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर महिलाराज

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर
 जळगाव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर महिलाराज

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

जिल्ह्यातील 15 पैकी आठ पंचायत समित्यांच्या (Eight Panchayat Committees) चाव्या महिलांकडे (Keys to women) राहणार आहे. या आठही पंचायत समित्यांचे सभापतीपद (Chairmanship) महिलांसाठी आरक्षीत (Reserved for women) करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, महसूल उप जिल्हाधिकारी शुभांगी भारदे, ग्रामपंचायत विभागाच्या नायब तहसीलदार रुपाली काळे, अव्वल कारकुन जागृती पवार, लिपीक महेश वानखेडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 जळगाव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर महिलाराज
हरताळा फाट्याजवळ बसचा अपघात : बारा जखमी

शासनाने दि. 30 सप्टेंबर रोजी जिल्हापरिषद अध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर केले होते. मात्र, राज्यात जून महिन्यात सत्ता परिवर्तन झाल्याने महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय आणि निवडणुक प्रक्रिया रदद बातल ठरविण्यात आल्या होत्या.

त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांसह पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नव्याने आरक्षण प्रक्रिया जाहीर होणार असून, पंचायत समिती सभापती पदासाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.

 जळगाव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर महिलाराज
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!
 जळगाव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर महिलाराज
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

ग्रामीण भागात कही खुशी कही गम

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर होण्यापुर्वी 15 तालुक्यांतील इच्छुकांचे या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले होते. आज आरक्षण सोडत असल्याने जळगाव , भुसावळ, जामनेर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव, भडगाव यासह 15 तालुक्यातील इच्छुक पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी केली होती.

 जळगाव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर महिलाराज
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'

बहुतांश ठिकाणी महिला आरक्षण निघाल्याने इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारीवर पाणी फिरले आहे. तर, महिला आरक्षण निघाल्याने त्या आरक्षणाविषयी उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी, कही खुशी, कही गम असे वातावरण दिसून आले. तसेच अपेक्षित प्रमाणे आरक्षण निघाल्याने इच्छुकांमध्ये भाऊगर्दीचे वारे वाहण्यास वाव मिळू लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com