शिंदे-फडणवीस सरकारच्या पोकळ घोषणा- महेश तपासे

शिंदे-फडणवीस सरकारच्या पोकळ घोषणा- महेश तपासे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील एक - एक प्रकल्प राज्याबाहेर जात असून ते थांबवण्यात शिंदे - फडणवीस सरकार( Shinde - Fadanavis Govt ) अपयशी ठरले आहे. फक्त पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे - फडणवीस सरकारला काहीच येत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (State Chief Spokesperson of NCP Mahesh Tapase )यांनी शनिवारी केली.

वेदांत फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्याबाहेर घालवल्यानंतर आता ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प मध्यप्रदेशमध्ये गेला. प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचे सत्र सुरूच राहिले. यावरून तपासे यांनी शिंदे - फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

महाराष्ट्रात शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर एक - एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा सुरू झाला आहे. वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्कड्रग पार्क आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन हा देखील प्रकल्प राज्याबाहेर जात आहे. हे सर्व प्रकल्प थांबवण्यामध्ये शिंदे - फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप तपासे यांनी केला.

राज्यात रोजगार कसा निर्माण करणार याचे उत्तर मुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री यांच्याकडे सध्यातरी नाही. राज्याला औद्योगिक विकास वाटेवर कसे आणणार आणि नवीन प्रकल्प राज्याबाहेर का गेला याचेही उत्तर शिंदे - फडणवीस यांनी जनतेला द्यायला हवे, अशी मागणी तपासे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com