Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मविआत लवकरच चर्चा - पटोले

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मविआत लवकरच चर्चा – पटोले

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात आघाडीने भाजपला (BJP) धूळ चारत मोठे यश मिळवले आहे. माहाविकास आघाडीत जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी लोकसभा आणि विधानसभा (Lok Sabha and Vidhan Sabha) निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पंढरपूर येथे दिली…  

- Advertisement -

…तर १६ आमदारांना अपात्रच करेन; नरहरी झिरवाळ स्पष्टच बोलले

नाना पटोले (Nana Patole) हे सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी पंढरपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभानिहाय चर्चा केली जाईल. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे. या मतदारसंघातून मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच (Congress) राहील. असे त्यांनी सांगितले.

नाशिक : शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुक्मिणीचे देखील दर्शन घेतले. विठ्ठल-रुक्मिणी हे गरीब, सर्वसामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी जनतेचे दैवत आहे. बळीराजा आज अस्मानी संकटाने घेरला असून असंवेदनशील खोके सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता विठ्ठलानेच बळीराजाचे अस्मानी, अवकाळी पावसापासून रक्षण करावे, अशी प्रार्थना केल्याचे पटोले यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या