Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या१२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार? महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

१२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार? महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

मुंबई l Mumbai

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी (Mahavikas Aghadi government delegation) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अशोक चव्हाण (Ashok CHavan), अनिल परब (Anil Parab), सतेज पाटील (Satej Patil), जयंत पाटील (Jayant Patil), सुभाष देसाई (Subhash Desai) यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

विधानसभेचं रिक्त असलेलं अध्यक्षपद (Assembly Speaker) आणि विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या (Legislative Council MLA) मुद्यांवरून ही भेट झाली असून, यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. ते अध्यक्षपदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.

हिवाळी अधिवेशनात सरकारने अध्यक्ष निवडणुकीची तारीख द्यावी म्हणून विनंती केली. पुन्हा अर्थसंकलपीय अधिवेशनात अध्यक्ष पद निवडणूक घ्यावे याबाबत २३ फेब्रुवारी रोजी प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी द्यावी यासाठीचं पत्र राज्यपालांना देण्यात आले.

आता या अधिवेशनात तरी विधानपरिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, मागील अधिवेशनातया मुद्य्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्या वाद पाहायला मिळाला होता.

मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपाल महोदयांना विधानपरिषदेचे जे १२ आमदार आहेत, ते जे काही प्रकरण गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. त्यास मान्यता देण्यासाठी त्यांना विनंती केली आहे. याचबरोबर विधासभेचं अध्यक्षपद याबाबत देखील परवानगी मिळावी. यासाठी देखीव आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यासाठी आम्ही मंत्री व सर्वजण त्यांना भेटलो. सकारात्मक चर्चा देखील झाली आणि सकारात्मक उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. लोकशाहीत बहुमताच्या सरकारचं महत्व असतं, त्याच्या निर्णयांना देखील महत्व असतं. राज्यपालांनी देखील या १२ आमदरांना लवकर न्याय देऊन, विधानपरिषदेच्या सभागृहात लोकांची सेवा आणि त्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संधी द्यावी. त्यांना वंचित ठेवू नये अशाप्रकारची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या