<p>नाशिक | प्रतिनिधी </p><p>राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महाविकास आघाडीने विजयश्री प्राप्त केली आहे. महाविकास आघाडीला मोठे यश आले असून महाविकास आघाडी यामुळे अधिक भक्कम झाल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते नाशकात माध्यमांशी बोलत होते...</p>.<p>ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडीने प्रत्येक जिल्ह्यात यश मिळवलेले दिसून येत आहे. एकूणच हे तिन्ही पक्षातील समन्वयाचे यश आहे. पुढील निवडणुकीतही सगळे एकत्र असतील असेही ते म्हणाले.</p><p>विरोधकांना मुंगेरीलाल चे सपने पडताय पडूद्या त्यावर काय बोलणार असे म्हणजे भाजपला त्यांनी चिमटा काढला. तसेच नामांतर या विषयात समन्वय समिती चर्चा करून मार्ग काढतील असेही यांनी सांगितले.</p>