Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याढोल ताशांच्या महावादनाने निनादला गोदाघाट

ढोल ताशांच्या महावादनाने निनादला गोदाघाट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या गोदाघाटावर (Godaghat) सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. काल सायंकाळी भव्य महावादन (Mahavadan) झाले. तरुणवर्गाचे आकर्षण असलेला ढोल-ताशा वादनाचा महोत्सव या वर्षी हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti) औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले हे महावादन भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वनवासी वीर आणि स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित करण्यात आले…..

- Advertisement -

एकूणच सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समितीतर्फे काल सायंकाळी 6 वाजता पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी, नाशिक येथे महावादन हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल 1000 युवाशक्तींनी सामूहिक ढोलताशा वादन सादर केले.

यावेळी जेष्ठ ताशावादक राजन घाणेकर (Rajan Ghanekar) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle), डी. जे. हंसवानी, तसेच नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे हे मंचावर उपस्थित होते.

सन 2016 पासून नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे (Nav Varsha Swagat Yatra Samiti) दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जात आहे. यावर्षी या महावादनाचे हे 6 वे वर्षे असून आजमितीस तब्बल जिल्ह्यातील 42 ढोलपथकांशी संपर्क साधून या महावादनाचे आयोजन करण्यात आले होते.

या महावादनामुळे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सर्व ढोलपथकांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि एकोपा ही भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने यावर्षी सर्वांचा एकत्रित मिळून एकच सुवर्ण कलश मंडित भगवा ध्वज नाचवण्यात आला.

एकूणच या महावादनात 1000 ढोल, 250 ताशे आणि 1500 वादक आणि झांज वादकांच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. या आयोजनात 150 स्वयंसेवकांनी काम केले आहे. या वर्षी श्रीराम नगरी ढोलताशा पथकाचे प्रमुख आशिष सोनावणे हे या महावादनाचे प्रमुख होते.

ध्वजप्रणाम करत भारत माता की जय या घोषणेने महावादन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पहिला हात मग पाचवा हात यांचे वादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि जिजाऊ साहेब यांची गारद देण्यात आली.

त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या सर्व पथकांची मिळून शिवस्तुती बसवण्यात आली होती. त्याचेदेखील यावेळी वादन व सादरीकरण करण्यात आले. मग नाशिक ढोल व पुणे ढोल या तालांचे सादरीकरण करण्यात आले. तब्बल दीड तास चाललेल्या या महावादनाने गोदातीर अक्षरशः दुमदुमून गेला होता.

या कार्यक्रमाद्वारे खूप मोठ्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित राहून तब्बल दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मध्यमा गुर्जर यांनी केले.

यावेळी शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, योगेश गर्गे, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दिपक भगत यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या