Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या‘पंतप्रधान मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता, तर महात्मा गांधी…’; अमृता फडणवीस यांचं मोठं...

‘पंतप्रधान मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता, तर महात्मा गांधी…’; अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!

नागपुर | Nagpur

राज्यात महापुरुषांवरील वादग्रस्त विधानाची मालिका ही संपण्याची चिन्ह काही दिसत नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नंतर आता अमृता फडणवीस यांनी देखील महात्मा गांधी यांच्या राष्ट्रपिता या मुद्यावरून केलेल्या व्यक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नागपुरात अभिव्यक्ती वैदर्भिय लेखिका संस्थेतर्फे अभिरूप न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अमृता फडणवीसांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मोदींच्या वाढदिवशी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी म्हंटल की, ‘आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं माझं ठाम मत आहे.’

…म्हणून पत्नीचा केला खून; मृत विवाहितेच्या आईची तक्रार

तसेच, ‘मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करत नाहीत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते’,असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या रोखठोक विधानांमुळे अनेकदा वाद होत असतो. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांचा बचाव केला होता. राज्यपाल मनाने मराठी माणूस आहेत आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठी भाषा शिकून घेतली, असे त्या म्हणाल्या होत्या.

विवाहितेचा मृतदेह हौदामध्ये आढळल्याने खळबळ, पतीसह सासू पोलिसांच्या ताब्यात.. कुठे घडली घटना?

- Advertisment -

ताज्या बातम्या