Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशMisal Pav : झणझणीत 'मिसळ पाव'चा जगभरात डंका; 'या' यादीत पटकावला ११...

Misal Pav : झणझणीत ‘मिसळ पाव’चा जगभरात डंका; ‘या’ यादीत पटकावला ११ वा नंबर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतात खाद्य संसस्कृती तशी खूप समृध्द आहे. आणि त्यातल्या त्यात मिसळ (Misal) नाशिकची की कोल्हापुरची हा वाद अगदीच प्रसिध्द आहे. मग त्यात पुणे, मुंबई, खान्देशी, नगरची अशा इतरही काही ठिकाणांचा समावेश आहे. पण मिसळ कुठलीही असो तिचा आनंद खवय्ये अगदी पुरेपुर आणि मनोभावे घेत असतात. महाराष्ट्रात मिसळ हा लोकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत मिसळचा समावेश असतो.

- Advertisement -

आता हा विषय येण्यामागच कारण म्हणजे, जगातल्या ५० पारंपारिक वेगन पदार्थांची यादी प्रसिध्द झाली आहे. टेस्ट अ‍ॅटलासकडून ही यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. टेस्ट अ‍ॅटलास यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, बेस्ट पारंपारीक खाद्यपदार्थांची यादी अशी पोस्ट शेअर केली आहे.

ग्वाकामोल, हम्मस आणि फलाफल, मसाला वडा यांसारख्या इतर पदार्थांचा ही या यादीमध्ये समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रसिध्द पदार्थ मिसळीचा समावेश करण्यात आल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली गेली आहे. या ५० पदार्थांच्या यादीमध्ये मिसळीचा ११ वा क्रमांक लागला आहे. जागतिक वेगन पदार्थांच्या यादीमध्ये मिसळीचा समावेश करण्यात आल्याने तिच जागतिक पातळीवरही महत्व वाढणार आहे यात काही दुमत नाही.

…तर जयंत पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं; खासदार कोल्हेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

मिसळ कशी बनवली जाते?

ज्यांना माहित नाही की मिसळ पाव म्हणजे काय आहे त्यांच्या माहितीकरिता सांगत आहे की, मिसळ म्हणजे झणझणीत तर्री असलेला रस्सा, त्यात मठ, मटकी, फरसाण किंवा शेव, त्यावर कोथिंबीर आणि कांदा हे सगळं रस्रामध्ये टाकून त्याच्या जोडीला पावासोबत एकत्रित असे खाल्ले जाते. काही ठिकाणी त्याच्या जोडीला आता पापड आणि दही हे ही दिले जाते. मिसळ-पावाचे अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात मिसळ पावाचे घटक बदलून ठिकाणानुसार ती दिली जाते. कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, खान्देशी मिसळ, नाशिकची मिसळ आणि अहमदनगरची मिसळ अशी विविध भागांची मिसळ आहे.

होय आम्ही…; ‘त्या’ विधानावरून राऊतांचा राज ठाकरेंना टोला

काय आहे टेस्ट अ‍ॅटलास?

जगातील पारंपारिक पदार्थांचे विश्वकोष आहे. जगातील कोणत्याही देशातील पारंपारिक पदार्थ त्यांत वापरले जाणारे पारंपारिक साहित्य या सगळ्याची माहिती टेस्ट अ‍ॅटलासच्या वेबसाईटवर मिळते. तसेच तुम्हाला एखाद्या देशाचे पारंपारिक पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट हवे असेल तर त्याची माहितीदेखील टेस्ट ऍटलासवर तुम्हांला उपलब्ध होते. 

सन २०१५ मध्ये मिसळ पावाला लंडनमधील फूडी हब पुरस्कार सोहळ्यामध्ये जगातील सर्वात चवदार शाकाहारी डिश म्हणून नाव देण्यात आले आहे. मिसळपावला मिळालेल्या नव्या ओळखीमुळे तुम्ही आधीच आनंदीत असाल तर तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे लोकप्रिय स्ट्रीटफूडच्या यादीमध्ये भेळपुरीने देखील टॉप ५० मध्ये स्थान मिळवले असून या यादीमध्ये ३७ व्या क्रमांकवर नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या यादीमध्ये अजूनही काही भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला असून त्यात २० व्या स्थानावर आलू गोबी २२ व्या स्थानावर राजमा, आणि २४ व्या स्थानावर गोबी मंच्युरीयनचा समावेश करण्यात आला आहे.

व्हिगन म्हणजे का?

व्हिगन किंवा विगन असा सहसा शब्दप्रयोग करण्यात येतो. व्हिगनचा अर्थ म्हणजे, दुधापासून किंवा प्राण्यांपासून तयार न झालेली पदार्थ. व्हिगन हा शाकाहाराचा एक प्रकार आहे. म्हणजेच शाकाहारीपेक्षा अधिक पटीने जास्त शाकाहारी. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिसळ व्हिगन कशी तर याच उत्तर अगदी सोप्प आहे. मिसळीमध्ये कडधान्याची भाजी, कडधान्याचा रस्सा त्यावर शेव किंवा फरसाण, कांदा कोथिंबीर, लिंबू अशी सर्वसाधारणपणे मिसळ तयार केली जाते.

दरम्यान यातले कोणतेच पदार्थ हे दुग्धजन्य नसल्याने किंवा त्यांचा प्राण्यांशी किंवा मांसाहाराशी संबंध येत नसल्याने मिसळ शाकाहारी पदार्थामध्ये मोडला गेला आहे. आता राहीला प्रश्न पावाचा किंवा ब्रेडचा, तर हे दोन्ही पदार्थ मैद्यापासून बनवले जातात ज्यात यिस्ट वापरलं जात. ज्यात इथेही दुग्ध वापरल जात नाही. यासर्व गोष्टींमुळे मिसळ हा १०० टक्के व्हिगन ५० पदार्थांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या