राज्यात थंडीचा तडाखा वाढला!

राज्यात थंडीचा तडाखा वाढला!

मुंबई | Mumbai

मागच्या चार महिन्यांपासून पावसाने थैमान घातल्यानंतर काही अंशी वातावरणात गारवा येत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे. यामुळे नागरिक थंडीपासून संरक्षणाबरोबरचं थंडीचा आनंद घेताना सुद्धा दिसत आहे.

महाबळेश्वरामध्ये तापमान ८ अंशांवर पोहोचलंय. तर वेण्णालेक ६ अंशांवर घसरलंय. परभणीत यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. परभणीत तापमान 8.3 अंशांवर पोहोचलंय.

नाशिकमध्येही हुडहुडी भरलेय. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्यानं पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे.

या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत असून धुळे शहराच्या विविध भागात नागरिकांची व्यायामासाठी गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com