महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्री संवाद साधणार ?

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्री संवाद साधणार ?

मुंबईः

राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी “राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल” अशी माहिती दिली.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. आज राज्यमंत्र्यांना सुद्धा कॅबिनेट बैठकीत बोलवण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात कडक लॉकडाऊनची मागणी काही मंत्र्यांनी केली. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. २१ एप्रिलपासून रात्री ८ वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबद्दलच्या निर्णयाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com