Rain Alert : राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain Alert : राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई | Mumbai

राज्यातील सर्वच भागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Rain Alert : राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
“मोदी चुकीचं बोलत आहेत, मी मुख्यमंत्री असताना...”; शरद पवारांनी सगळा इतिहासच काढला

राज्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे आणि मुंबईत विसर्जन मिरवणुकीतही पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील सिंहगड रोज परिसरात जोरदार पाऊस झाला. सलग आलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील ओढे, नदी, नाले भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

Rain Alert : राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Iraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू

आज कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com