Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यापदवीधर,शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; 'या' दिवशी होणार मतदान

पदवीधर,शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Graduate and Teacher Constituency Election) जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक,अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे…

- Advertisement -

याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ ला मतदान (Voting) होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. यासंदर्भात ५ जानेवारीला अधिसूचना निघणार असून उमेदवारांना १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत

नाशिक पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी काँग्रेसचे सुधीर तांबे (Sudhir Tambe) तर अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपचे रणजीत पाटील (Ranjit Patil) निवडून आले होते. मात्र यावेळेस राजकीय समीकरणे बदलली असल्याने नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. तर अमरावतीमध्ये भाजपने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप आणि शिंदे गटासमोर महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असणार आहे.

याशिवाय औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून मागील वेळेस राष्ट्रवादीचे विक्रम काळे (Vikram Kale) निवडून आले होते. तर कोकण शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील (Balaram Patil) आणि नागपूरमधून नागो गाणार (Nago Ganar) हे निवडून आले होते. पंरतु, आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार असल्याने प्रत्येक मतदारसंघात समीकरणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या