Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपॉझिटिव्हिटी रेट जाहीर, पाहा अनलॉकसाठी नाशिक, नगर, जळगाव कोणत्या टप्प्यात?

पॉझिटिव्हिटी रेट जाहीर, पाहा अनलॉकसाठी नाशिक, नगर, जळगाव कोणत्या टप्प्यात?

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 7 जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली. त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगर पालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

YUVA Scheme: केंद्राच्या या योजनेतून महिन्याला मिळणार ५० हजार

- Advertisement -

पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड उपलब्धता यानुसार या आठवड्याचे (14 ते 20 जून) स्तर जाहीर केले आहेत. सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे. दर शुक्रवारी नियमावली जाहीर होणार असून यानुसार उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे कोणत्या लेव्हलमध्ये आहे हे समजणार आहे.

नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 7.12 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2. 63 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश हा पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2. 06 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.82 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.64 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे

SSC Exam Results : राज्याचा दहावीचा निकाल ३ जुलैनंतर लागणार

काय आहेत निकष

पहिला गट – 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

दुसरा गट – 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

तिसरा गट – 5 ते 10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

चौथा गट – 10ते 20 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

पाचवा गट – 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

- Advertisment -

ताज्या बातम्या