भोंग्यांसाठी दोन दिवसांत गाईडलाईन

धोरण ठरविण्यासाठी गृहमंत्र्यांचे आदेश | राज्यासाठी काढणार अधिसूचना
भोंग्यांसाठी दोन दिवसांत गाईडलाईन

मुंबई | Mumbai

मशिदीवरील भोंग्याचे प्रकरण (loudspeakers issue) गेल्या काही दिवसात राजकीयदृष्ट्या तापलेले असताना आता राज्य सरकारही याबाबत सक्रीय झाले आहे. भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी (Home Minister Dilip Walse Patil) दिले आहेत. पुढील एक-दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवून मुंबईसह (Mumbai) संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. मनसेने ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली. (guidelines for loudspeakers)

याबाबत सोमवारी गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना धोरण ठरविण्याचे आदेश दिले आहेत. कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.