Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनंतर महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याचे नाव चर्चेत

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनंतर महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचे नाव चर्चेत

नवी दिल्ली । New Delhi

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत असताना दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election) विविध घडामोडी घडत आहेत. येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपला (BJP) घेरण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

भाजपच्या विरोधातील जवळपास सर्वच पक्ष या निवडणुकीत एकत्र आले आहेत. या विरोधकांनी सर्वानुमते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव सुचवले होते. मात्र त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर आता राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांचे नाव चर्चेत आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसच्या बैठकीसाठी तातडीचे निमंत्रण आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने (All India Congress Committee) सुशीलकुमार यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. त्यानुसार सुशीलकुमार शिंदे आज दिल्लीकडे (Delhi) रवाना झाले आहेत. त्यामुळे सुशीलकुमार यांचे आजचे सगळे कार्यक्रम (Program) रद्द करण्यात आले आहेत.

तसेच सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय अनुभव दांडगा असून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही भुषवले आहे. याशिवाय त्यांनी देशाच्या केंद्रीय गृहमंत्रीपदाची देखील धुरा सांभाळली आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहता विरोधकांकडून सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा आहे.तर दुसरीकडे राष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांच्या नावाची चर्चा होती, परंतु त्यांच्या नावाला जास्त पंसती मिळत नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी दोन नाव मात्र चर्चेत आहेत. यामध्ये झारखंडच्या (Jharkhand) माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि केरळचे राज्यपाल (Governor of Kerala) आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांचा समावेश असून भाजपकडून द्रौपती मुर्मू यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या