Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra MLC Election : शिक्षक, पदवीधर निवडणुकीचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर

Maharashtra MLC Election : शिक्षक, पदवीधर निवडणुकीचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर

देवळा तालुक्यात ५२.१३ टक्के मतदान झाले. २३९२ मतदारांपैकी १२४७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा देवळा येथे दोन तर उमराणे येथे एक अशा तीन मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. त्यात देवळा येथील पहिल्या मतदान केंद्रावर १००० पैकी ६२२ (६२.२० %), दुसऱ्या मतदान केंद्रावर १०५९ पैकी ४५८ (४३.२५ %) व उमराणे येथील मतदान केंद्रावर ३३३ पैकी १६७ (५०.१५ %) असे तिन्ही केंद्रांवर एकूण ५२.१३ टक्के मतदान झाले. ९८८ पुरूष व २५९ महिला पदविधा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला १६ उमेदवार व शेवटचा ‘नोटा’ पर्याय अशा १७ रकान्यांची अडीच फुटांची मतपत्रिका मतदारांच्या चर्चेचा विषय राहिली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar)  तालुक्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Graduate Constituency Elections) मतदानाला संथ प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत असून त्र्यंबकेश्वर आणि हरसूल येथील दोन्ही बूथ मिळून दुपारी १२ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झाले. त्यामध्ये १२० पुरुष आणि २० स्त्रियांनी मतदान केले आहे.लोणी बुद्रुक मतदान केंद्रावर पदवीधर निवडणूकीसाठी मतदान केल्यानंतर पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामस्थअहमदनगर जिल्ह्यातील सकाळी १२ वाजेपर्यंत झालेले मतदान
नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क सत्यजित तांबे यांचे वडिल डॉक्टर सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe), आई दुर्गा तांबे आणि पत्नी मैथिली तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क बजावला आहे.अकोले शहरातील मराठी मुलांची शाळा, अगस्ति विद्यालय, मॉडर्न हायस्कूल तसेच तालुक्यातील वीरगाव, समशेरपूर, कोतुळ,
ब्राम्हणवाडा, राजूर,साकीरवाडी, शेंडी या मतदान केंद्रांवर सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी 6 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळ पासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुके असल्याने दुपारी 12 नंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सकाळी 8 ते 10 या वेळेत झालेल्या मतदानाची आकडेवारीनाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज (30 जानेवारी) मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारांना सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दोन फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या पाचही जागांची मुदत ७ फेब्रुवारी रोजी संपत आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या