Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedप्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ असणारच

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ असणारच

प्रजासत्ताक दिनी (Republic Day) दिल्लीतील (Delhi) राजपथावर (Rajpath) होणाऱ्या पथसंचलनात (Republic Day Parade) महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Tableau)यंदाच्या पथसंचलनात दिसणार नाही, असे वृत्त आले होते. परंतु राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले…कोणी राजे आलेत का?

- Advertisement -

प्रत्येक २६ जानेवारीला (प्रजासत्ताक दिन) देशातील सर्व राज्य आपल्या राज्याची संस्कृती, कला, साहित्य याचा देखावा चित्ररथातून सादर केला जात असतो. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्र रथातून संत परंपरेवर आधारीत महाराष्ट्राच्या वैभवाचं चित्रण करण्यात आले होते.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या विविध विषयांमधून या वर्षी ‘महाराष्ट्राची जैवविविधता व मानके‘ या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे. याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या