मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे इयत्ता दहावी आणि बारावीचे पुरवणी परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के इतका लागला आहे.नाशिक विभागाचा दहावीचा ३७ तर बारावीचा २३ टक्के निकाल लागला.

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एएचसी व्होकेशनल या शाखांतील एकूण ६९५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६९२७४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले.

बारावीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४.७६ टक्क्यांनी घसरला आहे; याउलट दहावीच्या निकालात ९.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यातून ४१,३९७ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १३,४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीची परीक्षा देणाऱ्या ६९,२७४ विद्यार्थ्यांपैकी १२,७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

असा पाहा निकाल?

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल.

विभागीय निकाल

मंडळ दहावी बारावी

पुणे ३०.७६ १४.९४

नागपूर २९.५२ १८.६३

औरंगाबाद ३९.११ २७.६३

मुंबई २९.८८ १६.४२

कोल्हापूर ३०.१७ १४.८०

अमरावती ३२.५३ १६.२६

नाशिक ३७.४२ २३.६३

लातूर ३३.५९ २२.०५

कोकण - ३४.०५ १४.४२

एकूण - ३२.६० १८.४१

गुणपडताळणी २४ डिसेंबरपासून?

ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे