SSC Exam Results : राज्याचा दहावीचा निकाल ३ जुलैनंतर लागणार
निकाल

SSC Exam Results : राज्याचा दहावीचा निकाल ३ जुलैनंतर लागणार

निकाल बनवण्याची अशी असणार

नाशिक

राज्यातील दहावीचा निकाल (SSC Exam Results) लावण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शाळा व विभागीय मंडळाची प्रक्रिया ३० जूनपर्यंत पुर्ण होणार आहे. त्यानंतर ३ जुलैपर्यंत विभागीय मंडळ व राज्य मंडळाची प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी काढले आहे. यामुळे दहावीचा निकाल ३ जुलैनंतर लागणार आहे. हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागणार आहे.

निकाल
YUVA Scheme: केंद्राच्या या योजनेतून महिन्याला मिळणार ५० हजार

शाळास्तरावर दहावीचा निकालासंदर्भात सात जणांची निकाल समितीचे गठन करण्यात आले आहे. आज मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी मूल्यमापनाबाबत कार्यशाळा यूट्यूबद्वारे घेतली जाणार आहे. विषय शिक्षक आणि वर्ग शिक्षकांना ११ जून ते २० जून या १० दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुणतक्ते संकलित करून ते शाळा समितीकडे सादर करायचे आहेत. वर्ग शिक्षकांनी तयार केलेले निकाल प्रमाणित करण्यासाठी निकाल समितीला १२ ते २४ जून ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २१ जून ते ३० जून या मुदतीत निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मुख्याध्यापकांनी मंडळाच्या निकाल प्रणालीमध्ये भरायचे आहेत.

२५ ते ३० जून दरम्यान प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल आणि अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे मुख्याध्यापकांनी लाखबंद पाकिटात विभागीय मंडळात जमा करायचे आहेत. निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जारी केले आहे. याअंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

शाळेचा संकलित निकाल तयार करताना परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे नववीचे विषयनिहाय प्राप्त गुण नोंदविण्यात यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सवलतीचे गुण, कला आणि क्रीडा सवलतीचे गुण नोंदवण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.